आळंदीत पालिका कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत पालिका कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की
आळंदीत पालिका कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

आळंदीत पालिका कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की

sakal_logo
By

आळंदी, ता.२२ : आळंदी नगरपरिषदेतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी देऊळवाड्यातून पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले. वारकऱ्यांना विविध सुविधा पुरविणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे कर्मचाऱ्यांनी आळंदी पोलिसांच्या मनमानीबाबत पत्रक काढून निषेध व्यक्त केला.
प्रस्थान सोहळ्यासाठी मंगळवारी (ता.२१) पासधारकांना मंदिरात सोडण्यात येते. दरवर्षी पालिकेच्या ओळखपत्रावर कर्मचाऱ्यांनाही प्रवेश दिला जातो. पालिकेचे आठ ते दहा वरिष्ठ कर्मचारी मंदिरात ओवरीत बसलेले होते. त्यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी तेथून बाहेर काढले. त्यानंतर दर्शनासाठी समाधी मंदिराकडे जात असताना सर्व कर्मचाऱ्यांना आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी हाताला धरून सर्व कर्मचारी बाहेर काढले. यामध्ये बांधकाम विभागातील सचिन गायकवाड यांना मारहाणही केल्याने
कर्मचाऱ्यांनी सांगितले. यात महिलांची संख्या जास्त होती.
दरम्यान, पोलिसांचे अनेक नातेवाईक आमचेसमोर मंदिरात होते. त्यांना परवानगी कुणी दिली असा सवाल पालिकेचे कर्मचारी विचारत आहेत. आम्ही गेली आठवडाभर भाविकांना सेवा देतो. अशा वेळी हा सोहळा पाहण्याची आमचीही इच्छा असते. मात्र पोलिसांनी आमच्या आनंदावर विरजण टाकले, अशी भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
याबाबत आळंदीचे माजी नगरसेवक डी. डी. भोसले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत प्रस्थानवेळी उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनाही झाला प्रसंग सांगितला.


देऊळाड्यातील कृती उद्देशपूर्वक नव्हती. मंदिरात पासधारकांनाच सोडण्याबाबत देवस्थानकडून सूचना होती. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वारी होत असल्याने वारकऱ्यांची गर्दी मोठी होती. दिंडीकऱ्यांना आत घेणे महत्त्वाचे होते. पालिका कर्मचाऱ्यांकडे प्रवेश पास नव्हते. धक्काबुक्की नाही तर केवळ त्यांना पास नाही म्हणून बाहेर काढले होते.
- ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01468 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top