अमरनाथला यात्रेतील बेपत्ता महिला सुखरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरनाथला यात्रेतील बेपत्ता महिला सुखरूप
अमरनाथला यात्रेतील बेपत्ता महिला सुखरूप

अमरनाथला यात्रेतील बेपत्ता महिला सुखरूप

sakal_logo
By

आळंदी, ता. ९: आळंदी येथील दोन यात्रा कंपनीच्या माध्यमातून पुणे परिसरातून अमरनाथ यात्रेला गेलेले अडीचशे यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरुकृपा यात्रा कंपनीद्वारे दोनशे आणि माऊली यात्रा कंपनीद्वारे पंचावन्न भाविक अमरनाथ यात्रेला गेले होते.अचानक ढगफुटी झाल्याने अनेक भाविक बेपत्ता झाले. आळंदीतील दोन महिला भाविकांचा शनिवारी दुपारपर्यंत संपर्क होत नव्हता. परिणामी कुटुंबीय काळजीत होते. पण दुपारी चारनंतर दोघी सुस्थितीत
असल्याची माहिती आळंदी पोलिसांना यात्रा कंपनीचे संचालकांनी दिली. दोघी महिला तेथील बेसकॅम्पमधे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01478 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..