आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना पोलिस कोठडी
आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना पोलिस कोठडी

आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना पोलिस कोठडी

sakal_logo
By

आळंदी, ता. १२ : सुनेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले आळंदीचे माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि त्यांचे पती व मुलास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश खेड न्यायालयाने दिल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.
प्रियांका अभिषेक उमरगेकर (वय २९) या नवविवाहित सुनेने रविवारी (ता. १०) रात्री साडेआठच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केली होती. फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर, अशोक भगवान उमरगेकर, प्रियांकाचे पती अभिषेक अशोक उमरगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लगेच अटकेची कारवाईही केली. दरम्यान, आज आळंदी पोलिसांनी तीनही आरोपींना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01483 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top