आषाढी वारी पालखी सोहळ्याची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारी पालखी सोहळ्याची सांगता
आषाढी वारी पालखी सोहळ्याची सांगता

आषाढी वारी पालखी सोहळ्याची सांगता

sakal_logo
By

आळंदी, ता.२४ : संत ज्ञानेश्वर माउलींच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेऊन त्याची आज (ता.२४) नगरप्रदक्षिणा आणि पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या
दिंड्यांच्या हजेरीने आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज एकादशीनिमित्त दिवसभरात सुमारे लाखभर भाविकांनी समाधी दर्शन घेतले.

माउलींच्या पालखीचे २१ जूनला पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. त्यानंतर आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा पायी प्रवास करून पालखी सोहळा शनिवारी (ता.२३) आळंदी येथे परतला. दरम्यान, आज पहाटे माउलींच्या समाधीवर ब्रम्हवृंदांनी पवमान अभिषेक केला. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी समाधीचे दर्शन सुरू होते. दुपारी सव्वा एकला पालखी नगरप्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडली. पालखी हजेरी मारुती मंदिराजवळ आल्यानंतर दिंड्यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, बाळासाहेब चोपदार यांची उपस्थिती होती. स्थानिक आळंदीकर तरुणांनी पालखीच्या दर्शनासाठी स्वयंसेवकाचे काम केले. दिंड्यांची हजेरी झाल्यानंतर पालखी पालिका चौकांत आजोळघर मार्गे सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा मंदिरात प्रवेशली. त्यानंतर दिंडीप्रमुख, मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांची उपस्थिती होती.

दरम्यान, इंद्रायणी नदीपात्रात पाण्याने दुथडी भरून वाहत असल्याने इंद्रायणी काठीही भाविकांची गर्दी होती. आळंदी शहर पोलिसांनी मंदिर, मंदिर परिसर, हजेरी मारुती मंदिर आणि इंद्रायणी काठी चोऱ्या होवू नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारी नेमले होते.

माउली परतल्याने गर्दी वाढली
एकादशी असल्याने आज आळंदी, पुणे विभागातील अनेक भाविकांनी माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी केली होती. माऊली परतल्याने आळंदीकरांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते तर गेली महिनाभर लग्नांची संख्या मंदावली होती. माउली नसल्याने फारशी गर्दी नसल्याने मंदी होती. मात्र माउली परतल्याने दर्शनासाठी गर्दी वाढली आणि मंदिराभोवताल्याच्या व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

02783

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01493 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..