आळंदीतील अतिक्रमणांवर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील अतिक्रमणांवर हातोडा
आळंदीतील अतिक्रमणांवर हातोडा

आळंदीतील अतिक्रमणांवर हातोडा

sakal_logo
By

आळंदी, ता. ४ : अनधिकृत टपऱ्या, पथारीवाले आणि दुकानांच्या अतिक्रमणांवर आळंदी पालिका प्रशासनाने गुरुवारी (ता. ४) पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. पुढील तीन दिवस कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आळंदी शहरात तीन आठवड्यांपूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. त्यातून शहर स्वच्छतेचे मोहीमच प्रशासनाने घेतल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले. याबाबत पालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावल्या होत्या.
त्यानंतर गुरुवारी सकाळपासून पालिका प्रशासनाने शहरात ठिकठिकाणचे अनधिकृत बेकायदा स्टॉल, हातगाड्या, टपऱ्यांचे अतिक्रमण थेट जेसीबी लावून काढले. स्थानिक राजकीय आशीर्वादाने रस्त्यावर व पदपथावर थाटलेल्या बेकायदा अतिक्रमणांवर पालिकेने ही कारवाई केली. मरकळ रस्ता, वडगाव रस्ता आणि भैरोबा चौक परिसरात कारवाई केली. त्यामुळे येथील रस्ता आता प्रशस्त दिसू लागला. तर, पदपथही मोकळा झाला. पथारीवाल्यांचे तीन ते चार ट्रॅक्टर सामान या मोहिमेत जप्त केले.

आणखी तीन दिवस कारवाई
या कारवाईसाठी आळंदीतील अधिकारी आणि पोलिस, अशा वीस पोलिसांचा बंदोबस्त होता. अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिर परिसर, पदपथावर अतिक्रमण वाढल्याने पुढील तीन दिवस सरसकट कारवाई पालिका करणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01503 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..