आळंदी पालिकेत ‘लेट लतीफ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी पालिकेत ‘लेट लतीफ’
आळंदी पालिकेत ‘लेट लतीफ’

आळंदी पालिकेत ‘लेट लतीफ’

sakal_logo
By

आळंदी, ता. ७ : आळंदी पालिकेचे अनेक कर्मचारी सध्या सकाळी दहाऐवजी अकरा वाजल्यानंतरच म्हणजेच एक-दोन तास उशिराने पालिकेत हजेरी लावत आहेत. ठेकेदारी पद्धतीचे कर्मचारीच सध्या पालिका चालवीत असल्याचे चित्र आहे. गेली पाच वर्षे पालिकेत बायोमेट्रिक हजेरी बंद केल्याने लेटलतीफांचे फावले आहे.
आळंदी पालिकेत सध्या कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांच्या कामावर परिणाम दिसून येत आहे. पालिकेचे कर्मचारी बहुतांशवेळा उशिराच हजेरी लावतात. सकाळी दहा साडे दहा वाजता पालिकेत गेलात तर दोनतीन कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसते. पालिकेचे कर्मचारी अगदी वेळेत हजर झालेच तर दुपारी अडीचनंतर कामावर असतीलच याचीही खात्री नसते. दुपारनंतर तर पालिका रिकामीच दिसून येते. ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी पालिकेचे मुख्य टेबल सांभाळत असल्याचे दिसून येते. राज्य शासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांना भांडारगृहाचे काम दिल्याने त्यांची ड्यूटी आरामशीरच आहे. तर काही कर्मचारी मुख्याधिकारी आले की, नाही याची वाट पाहत कार्यालयात येण्याचे ठरवितात. मुख्याधिकारी नसले की यांची दांडी ठरलेलीच. कर्मचारी उशिरा येणे किंवा दांड्या मारण्याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनाही नागरिकांनी सांगूनही अद्याप सुधारणा नसल्याचे चित्र आहे. गेली पाच वर्षात लेट लतिफांवर कारवाई नाही. त्याचप्रमाणे लेट लतिफांना चाप बसावा यासाठी पालिका प्रशासनाने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. गलेलठ्ठ पगार असूनही कामावर वेळेत नसल्याने नागरिकांना मात्र चकरा मारण्याशिवाय पर्याय नाही.

गेली आठ दहा दिवसांपासून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी पुस्तकावर बिनपगारी रजा लावली आहे. अनेकजण कामाला येत होते. मात्र, दहा-दहा दिवस हजेरी पुस्तकावर सह्याच करत नव्हते. त्यांच्यावरही कारवाई केली आहे. काहींचे पगारही वजा केले आहेत. लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाणार आहे.
अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी पालिका

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01504 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..