आळंदीकर डेंगीच्या तापाने फणफणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीकर डेंगीच्या तापाने फणफणले
आळंदीकर डेंगीच्या तापाने फणफणले

आळंदीकर डेंगीच्या तापाने फणफणले

sakal_logo
By

आळंदी, ता. ७ : शहरात सध्या डेंगी, खोकला, सर्दीसारख्या संसर्गजन्य आजाराने नागरिक तापाने फणफणले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आणि मच्छरांचा उपद्रव वाढल्याने डेंगीचेही रुग्ण महिनाभरापासून सध्या आळंदीत (ता. खेड) वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तपासणी केल्यावरच रुग्णाला डेंगी झाल्याचे समजते. सध्या अनेकजण डेंगीमुळे आजारी आहेत तर काही उपचार घेऊन घरी परतल्याचे आहेत. विशेष करून लहानमुले डेंगीमुळे आजारी पडत आहेत. हवेतील संसर्ग, मच्छरांचा उपद्रव यामुळे लहान मुलांना सर्दी, डोकेदुखी, खोकला आणि तापाचे आजार होत आहेत. खोकला आल्यानंतर किमान पंधरा दिवस बंद होत नसल्याचे चित्र आहे. सध्या आळंदीतील वैद्यकीय व्यावसायिकांकडे आजारी रुग्णांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पावसाळी वातावरणाचा परिणामही आजारपणाला कारणीभूत आहे. शिवाय शहरात ठिकठिकाणी नागरिक अजूनही उघड्यावरच प्लॅस्टिक कचरा टाकत आहेत. चऱ्होली ग्रामपंचायत, केळगाव ग्रामपंचायत आळंदी हद्दीलगतचे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचलेले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरत आहे.


हद्दीच्या वादामुळे वाढला मच्छरांचा उपद्रव
कचऱ्याचे ढीग कुणी उचलायचा म्हणून महिना महिने कचरा पडून राहत असल्याचे चित्र आहे. परिणामी ग्रामपंचायत आणि पालिका हद्दीच्या वादामुळे नागरिकांना मच्छरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.पालिकेच्यावतीने जंतूनाशक पावडरही अभावानेच मारली जाते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भागीरथी नाल्यावर झुडपे वाढली आहेत. नदीकिनारी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक शौचालयांचा परिसर स्वच्छ नसल्याने मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.

आळंदी ग्रामीण रुग्णालयासोबत नगरपालिकेचे स्वतंत्र सहा कर्मचारी डेंगीसदृश रुग्णांच्या घी जाऊन तपासणी करत आहेत. डेंगीच्या मच्छरांची पैदास होणाऱ्या ठिकाणी स्वच्छता करून नागरिकांना जागृती करण्याचे काम करत आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी रोज कर्मचारी फिरून औषध फवारणी करत आहेत. नागरिकांनीही पाण्याची साठवण करू नये. बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका
02817

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01506 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..