बंधने घालून उत्सवाचे आयोजन करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंधने घालून उत्सवाचे आयोजन करावे
बंधने घालून उत्सवाचे आयोजन करावे

बंधने घालून उत्सवाचे आयोजन करावे

sakal_logo
By

आळंदी, ता. २४ ः यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने उत्साहाचा अतिरेक न करता गणेशमंडळांनी सण साजरा करावयाचा आहे. समाज उन्नतीची भावना मनात ठेवून सर्वांचा मानसन्मान हीच संकल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हवी. पोलिस आणि गणेशभक्तांमध्ये समन्वय राखण्यासाठी गणेशमंडळांनी स्वतःच बंधने घालून गणेश उत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी गणेश मंडळांना केले.
पोलिस आयुक्तालय चाकण विभाग अंतर्गत दिघी, आळंदी, चाकण, महाळुंगे पोलिस ठाण्यांमधील शहर, गावच्या गणेश मंडळांची बैठक आळंदीत पार पडली. यावेळी इप्पर बोलत होते. यावेळी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे, दिलीप शिंदे, वैभव शिनगारे, रमेश पाटील, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, कालिदास वाडेकर, सागर बोरूंदिया यांची उपस्थिती होती.
यावेळी इप्पर म्हणाले, ‘‘सण आनंदाने साजरा केला पाहिजे. पण स्वयंशिस्त, स्वतःवर बंधने घातली पाहिजे. उत्साहाचा अतिरेक नसावा, समाजउन्नतीची भावना गणेशभक्तांनी ठेवावी. शासनाने घालून दिलेले निर्देश पाळावेत, अन्यथा पोलिस कुणाचे मित्र नाही दुश्मनही नाहीत. सणांमध्ये आनंद साजरा केला पाहिजे. मात्र, त्यातून मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होता कामा नये. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत. गणेशोत्सव काळात एकही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे, याची दक्षता मंडळांनीच घ्यायची आहे. शासकीय निर्देशाचे फलक लावा. मंडळांच्याभोवती किती लोक जमतील त्या प्रमाणात स्वयंसेवक स्वतंत्र नेमावेत.’’
सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, ‘‘कोरोना काळात गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत चांगले सहकार्य केले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. सहाशे साठ गणेश मंडळे आहेत. पोलिसांकडून यंदाच्या वर्षी खूप काही नियम अटी नसणार आहेत. मात्र, आनंददायी गणेशोत्सव होण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच बंधन घालून घ्या. पोलिस गणेशभक्त समन्वय राखून काम करू. पोलिस अंमलदारांना दहा गणेश मंडळांची पालकत्व म्हणून जबाबदारी दिली जाईल. सार्वजनिक सुरक्षेसाठी मंडळांनी स्वतःचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून चोवीस तास कार्यरत ठेवावेत. ध्वनिप्रदूषण, पत्ते, जुगार, मद्यपान पूर्ण टाळावेत. शांततेतील मिरवणूक, प्रबोधनात्मक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारांचा गणराया ॲवॉर्ड देवून आयुक्तालय स्तरावर पोलिस गौरव करणार आहोत.’’

बैठकीतील मुद्दे
-दहा गणेश मंडळाचे पालकत्व पोलिस अंमलदारांकडे.
- जुगार, मद्यपान पूर्ण बंद
-प्रबोधनात्मक, पर्यावरणपूरक देखावे.
-पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मंडळांसाठी गणराया ॲवॉर्ड
- मंडळांनी स्वतःचे स्वयंसेवक नेमावेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01523 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..