आळंदी शहराची प्रशासनाकडून हद्दवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी शहराची प्रशासनाकडून हद्दवाढ
आळंदी शहराची प्रशासनाकडून हद्दवाढ

आळंदी शहराची प्रशासनाकडून हद्दवाढ

sakal_logo
By

आळंदी, ता. १९ : आळंदी लगतच्या आठ गावांचा आळंदी नगरपरिषदेमध्ये समावेष करून आळंदी शहराची हद्दवाढीचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला.
आळंदी पालिकेवर तहसीलदार वैशाली वाघमारे यांची प्रशासक म्हणून नेमणूक असून २७ नंबरच्या ठरावानुसार प्रशासकीय मंजुरी दिली.
आळंदी हद्दवाढबाबत सामाजिक कार्यकर्ते नीलेश कड यांची मागणी होती. केळगाव, सोळु, धानोरे, मरकळ, गोलेगाव, पिंपळगाव, चऱ्होली खुर्द आणि आळंदी ग्रामीण अशा आठ गावांचा हद्दवाढीत समावेश आहे.
आळंदीत एकादशी, लग्नासाठी होणारी गर्दी, वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी
येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, आषाढी कार्तिकी वारीत होणारी गर्दी यावरुन नियोजनासाठी हद्दवाढीबाबत चर्चा व मागणी होती. आळंदी हवेली आणि खेड भागात येते. हवेली भागात पिंपरी महापालिका असल्याने तिथे हद्दवाढ न करता खेड तालुका हद्दीत वाढ केली. सन २०११ च्या जनगणनेनुसार समाविष्ट गावची एकूण लोकसंख्या पंचवीस हजार आहे. आळंदीची अठ्ठावीस हजार आहे.
केळगाव चऱ्होलीचा कचरा आळंदी पालिकेकडे असतो. इतर गावचा कचरा व्यवस्थापन स्वतंत्र आहे. आळंदी पालिकेचा रखडलेला एसटीपी प्रकल्प पूर्ण होणे सोपे होईल. तसेच इंद्रायणी प्रदूषित असल्याने आळंदीत पिण्यासाठी मिळणारे भामाआसखेडचे पाणी आठ गावांना मिळू शकेल. बेकायदा प्लॉट विक्रीला आळा बसेल. नवीन गावच्या समावेशामुळे आळंदी पालिकेचे क्षेत्रफळ वाढणार आहे. तसेच आळंदी लगतच्या गावांना सुविधा देणे शासनालाही सोयीचे होणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01543 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..