आळंदी पालिकेची पार्किंग ठेकेदारास नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी पालिकेची पार्किंग ठेकेदारास नोटीस
आळंदी पालिकेची पार्किंग ठेकेदारास नोटीस

आळंदी पालिकेची पार्किंग ठेकेदारास नोटीस

sakal_logo
By

आळंदी, ता. १ : चाकण चौकातील इंद्रायणी काठावर पालिकेच्या मालकीचे वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारास करारनाम्यातील अटींचा भंग करून जादा दराने वाहनतळ शुल्काची वसुली केल्याप्रकरणी आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी नोटीस दिली आहे.
आळंदी पालिकेने वाहनतळ वसुलीबाबतचा वार्षिक ठेका वाहनतळ मक्तेदार आदित्य सांगळे यांना दिला आहे. याबाबत पालिकेने सांगळे यांच्याशी करारनामाही केला. करानाम्यानुसार दुचाकी वाहनास वीस, तीन चाकी वाहनांस पन्नास, चार चाकी वाहनांस दिडशे, अवजड वाहनांस दोनशे रुपये दर ठरवून दिलेला आहे. मात्र, वाहनतळामध्ये जादा दराने म्हणजे सरसकट पन्नासऐवजी शंभर रुपये ठेकेदार वाहनमालकांकाडून पार्किंग शुल्क आकारत आहे. याचबरोबर पावतीवर पालिकेचा शिक्काही नाही. एवढे करूनही वाहनतळावर आलेल्या वाहनमालकांशी गैरवर्तन करून शुल्क वसुली केली जाते. यामुळे ''ठेका रद्द का करू नये'' याबाबत पालिकेने संबंधित ठेकेदारास नोटीस काढली आहे.
''आळंदीत वाहनतळावर आर्थिक लुटमार'' या आशयाखाली ''सकाळ''मधे दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्द झाली होती. नागरिकांच्या तक्रारी आणि वृत्तपत्रातील बातमीचा उल्लेख करून पालिकेने ठेकेदारास नोटीस काढली. वास्तविक वाहनतळ शुल्क वसुलीचा वार्षिक ठेका पालिकेने साठ लाखांना दिला. चढ्या दराने निविदा भरल्याने पैसे वसुलीसाठी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जादा पैसे आकारण्याचा सपाटाच लावला. खरेतर ठेकेदारापेक्षा वसुली करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लेबल लावलेले तसेच काही राजकीय पदाधिकारीच उपस्थीत असत. यामुळे सक्तीने वसूलीबाबत भाविकांमध्ये नाराजी होती. बहुतांशवेळा वाहनचालकांच्या अनेकदा हमरीतुमरी होत असे. परिणामी आळंदी शहर आणि पालिकेचे नाव बदनाम होत असे. याची दखल घेत पालिकेने नोटीस काढली.


संबंधित ठेकेदारास नोटीस बजावणीसाठी पालिकेचे कर्मचारी घरी गेले होते. मात्र, ठेकेदार घरी नव्हता. आता नोटीस सोमवारी बजावणी केली जाईल. वेळीच सुधारणा झाली नाही तर ठेका रद्द करून पालिकेमार्फत वाहनतळ वसूली केली जाईल. तसेच पालिकेचे आजपर्यंत झालेली आर्थिक हानी संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली जाईल.
-अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका