एलईडी दिव्यांनी उजळले आळंदीतील रस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलईडी दिव्यांनी उजळले आळंदीतील रस्ते
एलईडी दिव्यांनी उजळले आळंदीतील रस्ते

एलईडी दिव्यांनी उजळले आळंदीतील रस्ते

sakal_logo
By

आळंदी, ता.३ : लाखो रुपये खर्चून आळंदी नगर परिषदेने पुणे आळंदी रस्ता आणि देहू आळंदी रस्त्यावर दुभाजकांवर लाइटचे पोल बसवून दिवे बसविले. एरवी सातत्याने अंधारातील रस्ता आता एलईडी दिव्यांनी उजळले आहेत.
दोन्ही रस्त्यांवर सतत वाहनांची वर्दळ असते. सोबत अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात वर्दळ करत आहेत. यामुळे रस्ता रूंदीकरणाची गरज होती. रस्ता रुंदीकरण झाले मात्र रस्त्यांवर पथदिवे एकाच बाजूला राजकीय हट्टामुळे लावल्याने वाहनचालकांची गैरसोय होती. अनेकदा रात्रीच्या अंधारात दुभाजकालाच चारचाकी वाहने धडकल्याने छोटे अपघात झाले होते. रात्रीच्या अंधारात दुभाजकच दिसत नव्हते. आता प्रशासकीय कामकाज सुरू असल्याने प्रशासनाला निर्णय घेताना अडचण नाही. यामुळे अनेक दिवसांपासून पुणे आळंदी रस्त्यावरील दुभाजकांवर रखडलेले विद्युत पोलचे काम पूर्ण झाले. यामुळे छोट्या अपघाताचे प्रमाण टळू शकणार आहेत.
दरम्यान, शहर सुशोभीकरण आणि प्रमुख रस्त्यांवर साफसफाई करत दुभाजकांमध्ये छोटी शोभेची रोपे लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे लवकरच शहरातील रस्ते चकाचक दिसणार आहेत.

पुणे-आळंदी आणि देहू आळंदी रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या रस्त्यांवर रस्त्याच्या मधोमध अपघात टाळण्यासाठी दुभाजक लावले. मात्र, गेली वर्षभरापासून दुभाजकांवर विद्युत पोल उभारण्याचे काम रखडले होते. आता प्रशासनाकडे पूर्ण कारभार असल्याने दोन्ही मार्गावरील दुभाजकांवर गेली चार दिवसांपासून विद्युत पोल उभारण्याचे काम सुरू होते. त्यावर एलईडी दिवेही बसविल्याने प्रमुख रस्ते उजळून निघाले आहेत.
- अंकुश जाधव, मुख्याधिकारी


दुभाजक पूर्ण करण्याची मागणी
पुणे-आळंदी रस्त्यावर चाकण चौक ते काळे कॉलनीपर्यंतच्या मार्गावर ठेकेदाराने स्थानिकांच्या मर्जीनुसार दुभाजकांमध्ये गाड्या जाण्यासाठी जागा सोडल्या. यामुळे ऐन वाहतुकीच्या वेळी मधूनच गाडी घुसविण्याचा प्रयत्न करत असल्याने छोटे अपघाताचे प्रसंग होत आहे. ठेकेदाराने कामाच्या आदेशानुसार काम न केल्याने हा प्रसंग ओढवत आहे. यामुळे दुभाजक पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधे होत आहे.

02926