आळंदीतील दांडियात तुंबळ हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील दांडियात
तुंबळ हाणामारी
आळंदीतील दांडियात तुंबळ हाणामारी

आळंदीतील दांडियात तुंबळ हाणामारी

sakal_logo
By

आळंदी, ता. ४ : पूर्ववैमनस्यातून आळंदीतील दोन गटांत झालेल्या भांडणात केळगावच्या तरुणास कोयता गॅंगच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. बंदोबस्तावर पोलिस असूनही भर चौकात झालेल्या मारहाणीमुळे गुन्हेगारी कारवाया तीर्थक्षेत्रात वाढल्याने आळंदी पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

सोमवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास दांडियाच्या कार्यक्रमातून तरुणास ओढून मारहाण झाल्याची चर्चा आज दिवसभर आळंदीत होती. कोयता गॅंग आणि दत्त मंदिर रस्त्यावरील गुन्हेगार मारहाणीत सामील होते. आळंदीतील चाकण चौकात वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने बघ्यांची गर्दी होती. पंधरा ते वीस जणांचे टोळके दहशत माजवण्याच्या दृष्टीने हातात कटर आणि दांडके घेऊन मोठ्या आवाजात शिवीगाळ करत होते. पोलिस मध्ये पडल्याने तरुणाचा जीव वाचला. मात्र पोलिसांविषयी आळंदीकरांचा नकारात्मक सूर आता उमटू लागला आहे.
आळंदी पोलिस ठाण्यात पन्नासहून अधिक पोलिस असूनही धाक राहिला नसल्याने ‘तीर्थक्षेत्रात चालले काय?’ असा सवाल आळंदीकर विचारत आहे.

याबाबत स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गोडसे म्हणाले, या भांडणाबाबत आमचेकडे फिर्यादच आलेली नाही.