संस्कार गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिनानिमीत्त मेट्रोतून सफारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कार गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांची
बालदिनानिमीत्त मेट्रोतून सफारी
संस्कार गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिनानिमीत्त मेट्रोतून सफारी

संस्कार गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिनानिमीत्त मेट्रोतून सफारी

sakal_logo
By

आळंदी, ता. १७ : येथील संस्कार एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार गुरुकुल स्कूल आळंदीच्या विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवडमधील मेट्रोची सफर करायला नेवून बाल दिन साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यालयातील शिक्षकांनी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले होते. त्यात सुहर्श सोनने या विद्यार्थ्याने पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविषयी भाषण केले. तसेच, इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. तसेच, शिक्षकांनी देखील नृत्य सादर करून मुलांचे मनोरंजन केले. यानंतर मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोची विद्यार्थ्यांना विस्तारित माहिती दिली. मेट्रो सफारीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. प्राचार्या शुभांगी धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ssociated Media Ids : ALD22B02979