''ज्ञानेश्‍वर''च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ, कुस्तीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ज्ञानेश्‍वर''च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ, कुस्तीत यश
''ज्ञानेश्‍वर''च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ, कुस्तीत यश

''ज्ञानेश्‍वर''च्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ, कुस्तीत यश

sakal_logo
By

आळंदी, ता.१९ : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारीद्वारा आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ, कुस्ती, तायक्वांदो, मैदानी खेळ स्पर्धेत यश मिळवले. दोंदे येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम आलेल्या सायली परायेला जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली.
तालुका क्रीडा संकुल खेड येथे झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये संस्कृती वाघे या मुलीने १९ वर्ष वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. समृद्धी घोलपने १७ वर्ष वयोगटांमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. चासकमान येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सार्थक खोपडे व संस्कृती मुंगसे या विद्यार्थ्यांनी १४ वर्ष वयोगटाखालील तर पंढरीनाथ डोंगरे व वैष्णवी पाटोळे या विद्यार्थ्यांनी १७ वर्ष वयोगटाखालील गटात यश मिळविल्याने जिल्हास्तरावर खेळण्यास निवड झाली.

दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक राजश्री भुजबळ, प्रकाश पवार, येडबा कांबळे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, क्रीडा समितीचे प्रमुख श्रीरंग पवार आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुंजा फड हिची चमकदार कामगिरी
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मुंजा फड या विद्यार्थ्याने पंधराशे मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर ४ बाय १०० रिलेमध्ये मुंजा फड, ज्ञानेश्वर विठ्ठल सोळंके, नागेश बाबासाहेब अवचार, ओमकार अशोक साकरूटकर व कृष्णा पंढरीनाथ वाणी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ३००० मीटर धावणे मध्ये ज्ञानेश्वर विठ्ठल सोळंके व १०० मीटर धावणे मध्ये मुंजा फड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर लांब उडीमध्ये मुंजा फड यांनी तृतीय क्रमांक मिळवला.