इंद्रायणी नदीचे संपूर्ण पात्र जलपर्णीमय

इंद्रायणी नदीचे संपूर्ण पात्र जलपर्णीमय

आळंदी, ता. ११ : डुडुळगाव ते आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून गेली तीन आठवड्यापासून सुरू आहे. मात्र, पिंपरी चिंचवड हद्दीतील जलपर्णी काढून झाली की संबंधितांकडून पाण्यातच पुढे आळंदीच्या दिशेने ढकली जात आहे. यामुळे आळंदीत इंद्रायणीचे संपूर्ण पात्र जलपर्णीमय झाले आहे. जलपर्णीमुळे वाढल्या डांसांचा उपद्रव वाढल्याने आळंदीकर त्रस्त झाले आहेत.

पिंपरी महापालिका हद्दीतून चिखली कुदळवाडी, तळवडे भागातून मोठ्या प्रमाणात मैलारूपी सांडपाणी सर्रास इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने गेली काही वर्षे नदीपात्रातील पाण्याला जलपर्णीचा विळखा पडला. पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्याने त्यावर जलपर्णीची वाढ बारमाही होवू लागली. मग जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांच्या निविदाही काढल्या जातात. जलपर्णी काढण्याचे काम म्हणजेच एक प्रकारे ठेकेदाराचाच फायदा होतो. कारण संपूर्ण जलपर्णी काढली जात नाही. तसेच सांडपाणी सोडणे काही थांबेना. कुणी याबाबत ओरड केली तर जुजबी कारवाई केल्याचे दाखवले जाते. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थेच असते. नदी काढलेल्या नागरिकांना जलपर्णीमुळे मच्छरांचा त्रास जाणवू लागला. नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले. मागील तीन आठवड्यापूर्वी पिंपरी महापालिकेने डुडूळगाव हद्दीत जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. यासाठी जेसीबी, रबर बोट आणि कर्मचारी काम करत आहे. मात्र काढलेली जलपर्णी नदी पात्राबाहेर काढून टाकण्याऐवजी तसीच पात्रात पुढे आळंदीच्या दिशेने ढकलली जात आहे.

कर्मचाऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन
जलपर्णी काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन नाही. परिणामी जलपर्णी काढण्याचा केवळ देखावा पिंपरी महापालिका हद्दीत होत आहे. जलपर्णी मात्र पुन्हा आळंदीकडेच सोडली गेल्याने सिद्धबेट परिसर, ज्ञानेश्वरी मंदिर ते गरूड स्तंभ परिसरात जलपर्णी पुन्हा दिसू लागली. आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू,गोलेगाव, मरकळ, तुळापूर भागातही आता जलपर्णीचा उपद्रव दिसू लागला आहे.
.....................
03123

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com