आळंदीत फराळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत फराळ वाटप
आळंदीत फराळ वाटप

आळंदीत फराळ वाटप

sakal_logo
By

आळंदी, ता. १९ ः महाशिवरात्रीनिमित्त आळंदीतील सिद्धेश्वर, चऱ्होलीतील वाघेश्वर, मोशीतील नागेश्वर, वडगाव घेनंद येथील घाटामधील बेलीचा महादेव आणि धानोरेतील धनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. धानोरे येथील धनेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी दिवसभर फराळ वाटप करण्यात आले.
आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. चऱ्होलीतील वाघेश्वर मंदिरात फुलांची आणि विद्युत माळांची भव्य आरास केलेली होती. वडगाव घेनंद येथील बेलीच्या महादेवाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने आले होते. धानोरे येथील इंद्रायणीकाठी असलेले धनेश्वर मंदिरात फराळ वाटप करण्यात आले. मोशीतील नागेश्वर मंदिरातही भाविकांची दिवसभर गर्दी होती.