
आळंदीत विद्यार्थ्यांकडून मातृपितृ पूजन
आळंदी, ता. २२ : कपाळी कुंकुम तिलकाचा शृंगार... मस्तकावर अक्षता... गळ्यात हार...अन् पायाशी नतमस्तक झालेले विद्यार्थी... अशा भारलेल्या वातावरणात
आळंदी येथील (ता. खेड) येथे ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात मातृपितृ पूजनाचा सोहळा रंगला.
पालकाप्रती पूज्य भाव पाहून भारावलेल्या पालकांच्या आणि उपस्थित शिक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हा मातृपितृ पूजनाचा संस्कारक्षम सोहळा होता आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात मातृपितृ पूजन सोहळ्याची सुरुवात माऊलींच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर ,मंजुश्री वडगावकर, विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा, आई-वडील उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आई-वडील हे माऊलींचे रूप असून, आपल्या जडणघडणीत व जीवन यशस्वी होण्यात त्यांचा सर्वात मोठा सहभाग असतो.
विद्यालयातील संस्कारक्षम सोहळा दरवर्षीप्रमाणेच भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या वर्षी आई-वडिलां बरोबरच आजी - आजोबा देखील बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, सोहळा पार पडण्यासाठी वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण या सर्व शिक्षकांचे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.
त्रिलोचन बनण्याकरिता आशीर्वाद
विद्यार्थ्यांनी आईवडीलांना कुंकुम तिलकाने पूजन आणि हार घालून ओवाळले. दोघांनीही एकमेकांना गोड खाऊ, खाऊ घातला. मुलांनी आईवडीलांना सात प्रदक्षिणा घालून त्यांच्या पायावर नतमस्तक झाले. आई वडिलांनी मुलांना मिठीत घेऊन त्रिलोचन आणण्याकरिता आशीर्वाद दिले. मुलांनी देखील आई, वडील, गुरुजनांचा आदर करण्याचा संकल्प केला.
03181