Sat, April 1, 2023

खोकला, सर्दीचे रुग्ण आळंदी परिसरात वाढले
खोकला, सर्दीचे रुग्ण आळंदी परिसरात वाढले
Published on : 7 March 2023, 2:33 am
आळंदी, ता ७ : आळंदी आणि परिसरातील गावांमध्ये होळी अन धुलवडच्या दोन दिवसांत ऊन पाऊस आणि थंडीचा प्रत्यय नागरिकांना आला. अचानक ऋतू बदलाने खोकला सर्दीचे रुग्ण मात्र वाढले.
आळंदीत दिवसा गरम आणि रात्री थंडी असे वातावरण होते. मात्र, दोन दिवसात अचानक पाऊस पडू लागला. आळंदी चऱ्होली वडमुखवाडी चोविसावाडी दिघी मरकळ गोलेगाथंव वडगाव सोळू केळगाव धानोरेमध्ये ऊन पाऊस थंडी असे एकाच दिवशी तीन ऋतुंचा अनुभव आला. काल होळीच्या दिवशी काही ठिकाणी हलका पाऊस पडला. यामुळे वातावरणात बदल झाल्याने गेली काही दिवस सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे चित्र आहे.