आळंदी येथे दिव्यांगांना अनुदान वितरित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी येथे दिव्यांगांना अनुदान वितरित
आळंदी येथे दिव्यांगांना अनुदान वितरित

आळंदी येथे दिव्यांगांना अनुदान वितरित

sakal_logo
By

आळंदी, ता. २५ : आळंदी नगरपरिषदेची एकशे बारा दिव्यांगांना चालू आर्थिक वर्षात प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत वितरित केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील पात्र दिव्यांगांची नोंदणी केली. यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजारप्रमाणे एकूण तीन लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.
केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ३७ (ब) मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. या निधीतून शहरातील पात्र दिव्यंगांना कृत्रिम अवयव देणे, आर्थिक सहाय्य करणे अशा विविध प्रकारे मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात.
दिव्यांगांना औषधोपचार किंवा त्यांच्या इतर दैनंदिन गरजा भागविणे शक्य व्हावे म्हणून चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) आळंदी नगरपरिषदेमार्फत डिसेंबर महिन्यात प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे आणि आता प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे दोन्ही रकमा मिळून दिव्यांगांच्या खात्यावर सहा लाख सोळा हजार रुपये वितरित करण्यात आले.
नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रतिकात्मक स्वरूपात चेकचे वितरण केले. दिव्यांगांच्या बँक खात्यावर निधी वितरण करण्यात मुख्याधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या अर्चना पवार, वैशाली पाटील,अरुण घोडे या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.