आळंदीत शिव छायाचित्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत शिव छायाचित्र प्रदर्शन
आळंदीत शिव छायाचित्र प्रदर्शन

आळंदीत शिव छायाचित्र प्रदर्शन

sakal_logo
By

आळंदी, ता. २ : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील अस्सल दुर्मिळ चित्रे आणि शस्त्रांचे प्रदर्शनाचे आळंदीकर आणि वारकऱ्यांनी अनुभवले.

आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात हे प्रदर्शन सागरमाथा, मऱ्हाठा पातशाह, श्री शिवस्वराज्य सांस्कृतिक प्रतिष्ठान, गड किल्ले सेवा संस्था आणि दगडाच्या देशा यांसारख्या विविध संस्थांनी रामनवमीचे औचित्य साधून भरवले. प्रदर्शनातील अस्सल आणि दुर्मिळ चित्रे शिवप्रेमींना आकर्षित करत होती. परदेशातील विविध चित्रकारांनी साकारलेली छायाचित्रे प्रदर्शनात पाहायला मिळाली.
फ्रान्स, बर्लिन, जर्मनी, नेदरलँड, लंडन, मुंबई ठिकाणची त्यांची ही मूळचित्रे आहेत, असे आयोजकांनी सांगितले.
छायाचित्रांसोबत माहितीचे फलकही लावण्यात आले होते.
सोबत छत्रपती शिवाजी राजांच्या काळातील वापरण्यात येणारी काही शस्त्रेही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
------------------------
आळंदी ः छत्रपती शिवाजी राजांची दुर्मिळ चित्रांचे आणि शस्त्रांचे आळंदीत भरविण्यात आलेले प्रदर्शन.