Fri, Sept 29, 2023

वडमुखवाडी ट्रस्टकडून मोरे यांचा सत्कार
वडमुखवाडी ट्रस्टकडून मोरे यांचा सत्कार
Published on : 21 April 2023, 9:11 am
आळंदी, ता. २० : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहूच्या अध्यक्षपदी हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांची निवड झाल्याबदल सत्कार करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या वेळी मोरे यांनी थोरल्या पादुका मंदिराच्या कामाची पाहणी केली. देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, माजी विश्वस्त विलास मोरे यांचाही सत्कार ट्रस्टतर्फे खजिनदार दत्तात्रेय गायकवाड, मनोहर भोसले, साहेबराव वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रमेश महाराज घोंगडे, किसन लोखंडे, रमेश चौधरी, बाळासाहेब ठाकूर, तानाजी चौधरी, शिवाजी तळेकर उपस्थित होते.