Wed, Sept 27, 2023

धानोरे शाळेतील
१४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
धानोरे शाळेतील १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
Published on : 29 April 2023, 11:27 am
आळंदी, ता. २९ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती परिक्षेत (एनएमएमएस)आळंदीजवळील धानोरे शाळेतील १४ विद्यार्थी केंद्रीय उज्वल यश गुणवत्ता यादीत यशस्वी झाले. तर, सारथीसाठी १३ विद्यार्थी पात्र ठरले. एकूण ४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना पुनम देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे : आदित्य राठोड, आर्यन गावडे, रितेश डंकिनवाड, कृष्णा मोरे, सार्थक ठाकूर, सूरज खांडे, सिद्धेश कोळेकर, तनुजा धाकपाडे, निखिल तलवाडे, सभ्यता आराख, कार्तिक चव्हाण, कृष्णा ढाकणे, ओंकार भंडारे, वृषाली नेवारे.