आळंदीतील शिक्षकांकडून पारंपरिक वेशभूषा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील शिक्षकांकडून पारंपरिक वेशभूषा
आळंदीतील शिक्षकांकडून पारंपरिक वेशभूषा

आळंदीतील शिक्षकांकडून पारंपरिक वेशभूषा

sakal_logo
By

आळंदी, ता. २ : ध्वजवंदन, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पारंपारिक वेशभूषा परिधान करत आळंदीत सरकारी कार्यालय, शाळांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. आळंदी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, पालिका कार्यालयात मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तलाठी कार्यालयात मंडलाधिकारी स्मिता जोशी यांच्या हस्ते तिरंगा उभारून ध्वजवंदन करण्यात आले.
याचबरोबर संस्कार एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार गुरुकुल विद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांनी नऊवारी साडी आणि भगवा फेटा अशी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून मराठी गाणी सादर केली. यावेळी प्राचार्या शुभांगी धोंडगे व शिक्षक उपस्थित होते. यावेळी दिव्या औटी या शिक्षिकेने मराठी गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी फडके यांनी केले. आभार आनंदा दगडे यांनी केले.