आळंदीतील साखळी उपोषण अखेर मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील साखळी उपोषण अखेर मागे
आळंदीतील साखळी उपोषण अखेर मागे

आळंदीतील साखळी उपोषण अखेर मागे

sakal_logo
By

आळंदी, ता. ५ : इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निगडित असलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक येत्या दहा दिवसांत पुण्यात घेणार असल्याच्या लेखी आश्‍वासनानंतर आळंदीतील इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे गेली पाच दिवस सुरु असलेले साखळी उपोषण शुक्रवारी (ता. ५) मागे घेण्यात आले.
मंडलाधिकारी स्मिता डामसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उपोषणकर्त्यांना लिंबुपाणी देत लेखी आश्वासनाची प्रत दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, पोलिस निरीक्षक रमेश पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची उपस्थिती होती. तर, इंद्रायणी फाउंडेशनचे पदाधिकारी विठ्ठल शिंदे, अरुण बडगुजर, शिरिष कारेकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पुरुषोत्तम हिंगणकर, डॉ. सुनील वाघमारे यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीच्या आयोजनाचे आश्वासन यावेळी दिले.
दरम्यान, गुरुवारी (ता. ४) पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी चाललेले साखळी उपोषणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले. तर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याशी उपोषणकर्त्यांची मोबाईलवरून शुक्रवारी चर्चा झाली. यावेळी इंद्रायणी फाउंडेशन पदाधिकाऱ्यांना प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी संबंधित विषयास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दहा दिवसांत बैठक घेण्याबाबतचे लेखी आश्‍वासनाचे पत्र दिले.
यावेळी माजी नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, दिनेश घुले, प्रकाश पानसरे यांची उपस्थिती होती दादासाहेब करांडे यांनी आभार मानले. संबंधित पत्र जाहीरपणे शिरीष कारेकर यांनी वाचून दाखवले व पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिक संस्थांचे आभार मानले.