Wed, October 4, 2023

आळंदीत मुलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
आळंदीत मुलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर
Published on : 6 May 2023, 2:41 am
आळंदी, ता. ६ : येथील संस्कृती प्री. प्रायमरी स्कूलमध्ये लहान मुलांसाठी शुक्रवार (ता. ५) पासून एक महिन्यासाठी मोफत प्रशिक्षण शिबिर सुरु झाले आहे. याप्रसंगी नियुध्द कराटे व किक बॉक्सिंगचे मोफत प्रशिक्षणासाठी प्रकाश बोइनवाड आणि प्रणव सकुंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अविनाश तापकीर, राकेश सिंग, संतोष वायाळ, चंद्रकांत जाधव, सूरज जंगम, उत्तम वराळे, अनघा पाठक, पूजा शिंदे आदी उपस्थिती होते.