Wed, October 4, 2023

आळंदी सोसायटीच्या
अध्यक्षपदी दिलीप मुंगसे
आळंदी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप मुंगसे
Published on : 11 May 2023, 11:53 am
आळंदी, ता. ११ : येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी केळगावचे दिलीप मुंगसे यांची बिनविरोध निवड झाली. तर, उपाध्यक्षपदी आळंदीतील अरुणा घुंडरे यांची निवड झाली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. धादवड यांनी काम पाहिले. सोमनाथ मुंगसे, बाबूलाल घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, राहुल चिताळकर, संतोष वीरकर, रोहिदास मुंगसे, अनिल भांडवलकर, सिंधूताई कुऱ्हाडे, सुभाष सोनवणे, वासुदेव मुंगसे, विलास घुंडरे आदी यावेळी उपस्थित होते.