
आळंदीत शिबिरात दोनशे जणांचे रक्तदान
आळंदी, ता. १५ : आळंदीजवळील डुडूळगाव येथे दोनशे अकरा रक्तदात्यांनी रविवारी (ता. १४) रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले. या वेळी आळंदी पालिका माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनीही रक्तदान केले.
आळंदी-मोशी रोडवरील वेदश्री तपोवन परिसरात सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण आणि मित्र परिवाराच्या वतीने शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीराचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, दिनेश घुले, नंदकुमार वडगावकर, आशिष गोगावले, सचिन तळेकर, मनोहर दिवाणे, नानजीभाई ठक्कर, श्रीपाद देशमुख, संभाजी धायरकर, ज्ञानेश्वर वहिले, दिगंबर तळेकर, अजय तापकीर, हिरामण आल्हाट, सूरज रांजळे, शशिकांत बाबर, संजय बोराटे, सतीश जरे, हिरामण तळेकर, शाम गावडे, रमेश वहिले उपस्थित होते. या शिबिरासाठी खुशांत त्रिवेदी, डॉ. भूषण जगताप, डॉ. सुहास गायकवाड, डॉ. योगेश चव्हाण, डॉ. अमित लिंबाळे, डॉ. अक्षय शिनगारे यांनी परिश्रम घेतले.