ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने गुन्हा
ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने गुन्हा

ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने गुन्हा

sakal_logo
By

आळंदी, ता. १६ : मुलीशी ओळख वाढवून लग्न जमवले...२३ तोळ्यांच्या हुंडा घेतला...लग्नाची तारीखही ठरली...शारीरिक संबंधही ठेवले...मात्र, ऐनवेळी स्वभाव जुळत नसल्याचे कारण देत नकार दिला. या फसवणुकीच्या घटनेने व्यथित झालेल्या नियोजित वधूने ऐनवेळी नियोजित वरासह पाच जणांवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा केला.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुळचे शेवगाव (जि. नगर) व सध्या चिखली (पिंपरी) येथे राहणारा नियोजित वर देवदत्त वसंत भारदे आणि डॉ. वसंत दत्तात्रेय भारदे, दोन महिला आरोपी व अमित डहाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी तरुणी आणि आरोपी देवदत्त यांचा लग्नासाठी एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम मागील वर्षी झाला. मुलगा दुबईत असल्याने आॅनलाईनच एकमेकांना पाहून घरच्यांनी लग्न जमवले. आॅक्टोबरला साक्षिगंध झाला. त्यानंतर फिर्यादी व तिच्या घरच्यांच्या विश्वास संपादन करून नियोजित वधूला कर्जत (जि. रायगड) येथील एका रिसॉर्ट नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे फिर्यादीच्या घरच्यांकडून देवदत्त याच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून १६ लाख रुपयांचे २३ ग्रॅम वजनाचे दागिने बनवून घेतले.
दरम्यान, लग्नाची तारीख डिसेंबर महिन्यात उशिराची ठेवली. फिर्यादीच्या घरच्यांना सांगून मंगल कार्यालय व इतर लग्नाचा खर्च करायला सांगितला. मात्र, २८ एप्रिलला नुकतेच ऐनवेळी आरोपींनी स्वभाव जुळत नसल्याचे कारण सांगून लग्नाला नकार दिला. यावरून पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक नाही. आळंदी पोलिस याचा पुढील तपास करत आहेत.