आळंदीत सिद्धबेट विकासकामांचे भूमिपूजन

आळंदीत सिद्धबेट विकासकामांचे भूमिपूजन

आळंदी, ता. २९ : मुंबईस्थित मानवी मूल्यांसाठी आंतरराष्ट्रीय संघटना (आयएएचव्ही) या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून सिद्धबेटामध्ये पर्यटन, अध्यात्माच्या दृष्टिने पावित्र्य राखण्यासाठी सुधारणा करण्याच्या कामास पालिकेने शुभारंभ केला. मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (ता.२९) झाले.
यावेळी माजी नगरसेवक डि. डि. भोसले, सचिन गिलबिले, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते विठ्ठल शिंदे, शिरीष कारेकर, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनील वाघमारे, अरुण बडगुजर, किरण नरके, तसेच आय.ए.एच.व्ही. संस्थेचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, आळंदीकर उपस्थित होते.
मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले की, या संस्थेच्या माध्यमातून नगरपरिषदेने सुचविलेल्या कामानुसार भाविकांसाठी बसण्यास लोखंडी आणि दगडी आसनव्यवस्था केली जाणार आहे. येथील दगडी ट्रॅकची डागडुजी आणि कडेला सोलर पथदिवे बसविले जातील. वारकरी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि सुरक्षा रक्षकासाठी खोलीचे काम प्राधान्याने केले जाईल. प्रवेशद्वार सुशोभीकरण, फुलझाडे आणि तुळशीचे रोपण केले जाणार आहे. सिद्धबेटाचे पावित्र्य राखून संतांच्या वास्तव्याचे दर्शन घडविणारी भित्तिचित्रेही साकारली जाणार आहेत.

चला एक पाऊल सिध्दबेटकडे मोहिमेला प्रतिसाद
श्री संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई या संत भावंडांचे वास्तव्य असलेल्या सिद्धबेटात सांप्रदायिक साधना करण्यासाठी, पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून येथे येतात. पण गेली अनेक वर्षे सिध्दबेटाची अवस्था फार बिकट झाली होती. ‘चला एक पाऊल सिध्दबेट’कडे या आळंदीकरांच्या मोहिमेमुळे भाविकांची पाउले सिध्दबेटकडे वळाली आहेत. त्याचबरोबर कामासाठी योगदान देणारे कार्यकर्तेही वाढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com