डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

आळंदी, ता. २९: पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरची धडक दुचाकीस बसली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले तात्याभाऊ रावसाहेब धोत्रे (वय ७६,रा.आळंदी देवाची) यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२८) सायंकाळी साडेसहा वाजता आळंदीत वडगाव रस्त्यावर घडली.
दुचाकी चालवणारा त्यांचा चुलतभाऊ परमेश्वर बाळासाहेब धोत्रे यांच्या पायाला मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी डंपर चालक सोपान लक्ष्मण काळे (रा.कोयाळी,ता.खेड) याच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.
फिर्यादी परमेश्वर धोत्रे आणि त्यांचा चुलतभाऊ तात्याभाऊ दोघेजण मोटारसायकलवरुन पुतण्याचे मेडिकल दुकान पाहण्यासाठी चालले होते. यावेळी भरधाव येणाऱ्या डंपरने पाठीमागून धडक दिली. यामुळे पाठीमागे बसलेले तात्याभाऊ रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. यात त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com