आळंदी नगरपरिषदेची
३८व्या क्रमांकावर झेप

आळंदी नगरपरिषदेची ३८व्या क्रमांकावर झेप

आळंदी, ता. ५ : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा’ अभियानात एकशे सतरा नगरपरिषदांमधून अडतिसावा क्रमांक मिळाला, अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
राज्य सरकारद्वारे एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायतीस्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गटातील ११७ नगरपरिषदांमध्ये आळंदी नगरपरिषदेने मागील वर्षीच्या ८१व्या क्रमांकावरून प्रगती करत ३८व्या क्रमांकावर झेप घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com