आळे येथे ४० वर्षांपूर्वीचा पुन्हा भरला वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथे ४० वर्षांपूर्वीचा पुन्हा भरला वर्ग
आळे येथे ४० वर्षांपूर्वीचा पुन्हा भरला वर्ग

आळे येथे ४० वर्षांपूर्वीचा पुन्हा भरला वर्ग

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३० ः ज्ञानमंदिर हायस्कूल आळे (ता. जुन्नर) येथील १९८२च्या बॅचच्या सवंगडी ग्रुपमधील विद्यार्थ्यांचा तब्बल चाळीस वर्षानंतर वर्ग भरला. आपल्या गुरुजनांसमवेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास सर्वांनी आपल्या गुरुजनांना आमंत्रित करून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यामध्ये जवळ- जवळ तीस ते पस्तीस विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
या मेळाव्यासाठी बरेचजण पुणे, मुंबई, अकोले, नाशिक या ठिकाणाहून कार्यक्रमास आले होते. कार्यक्रमाच्या वेळी बऱ्याच जणांनी आपल्या चाळीस वर्षातील करिअरची माहिती एकमेकांना सांगितली. तसेच सर्वजण बालपणीच्या आठवणींमध्ये आणि गप्पांमध्ये रममाण झाले होते. त्यामुळे महाविद्यालयातील गतकालीन जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. स्नेहमेळाव्याचे संयोजन, आयोजन सवंगडी ग्रुपतर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमास आडवळे, सी. एस. भुजबळ, एरंडे, वाव्हळ, गुंजाळ आणि प्रताप कुऱ्हाडे आदी गुरुजन उपस्थित होते.
यावेळी दिलीप गडगे, तुकाराम जाधव, राजेंद्र वनारसे, प्रशांत जोशी, शिवाजी गुंजाळ, अरुण शिंदे, रंजना बढे-डुंबरे, कांता पाडेकर-भालेराव इत्यादी विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आदरयुक्त आणि कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. तसेच सुनील कुऱ्हाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा कार्यभाग सांभाळला असून सुनील तितर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर अजय शेटे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00778 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top