बोरी येथील बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी येथील बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा
बोरी येथील बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा

बोरी येथील बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ५ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील मोळंके मळा बंधाऱ्यात पाण्याची साठवण झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
या बंधाऱ्याच्या कामासाठी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यासाठी शरद लेंडे यांच्या प्रयत्नातून २३ लाख ८० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. बंधारा आरसीसी करण्याची मागणी माजी सरपंच पुष्पा कोरडे यांनी केली होती. बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण झाले. त्यामुळे पिंपळगाव जोगे कालव्याचे आवर्तन आल्यानंतर बंधाऱ्यात पाणी साठवण झाली. त्याचा फायदा विहिरी व कूपनलिका यांना होऊन उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होऊन येथील १०० ते १२० हेक्टर क्षेत्र उन्हाळ्यात ओलिताखाली घेण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00782 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top