आळे येथे सर्टिफिकेट कोर्सबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथे सर्टिफिकेट कोर्सबाबत मार्गदर्शन
आळे येथे सर्टिफिकेट कोर्सबाबत मार्गदर्शन

आळे येथे सर्टिफिकेट कोर्सबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ४ ः आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक्स इन फार्मसुटीकल केमिस्ट्री या सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते.
सर्टिफिकेट कोर्सच्या सांगता कार्यक्रमात समन्वयक कॅप्टन डॉ. सुषमा कदम यांनी कोर्सच्या यशस्वीतेबद्दल माहिती दिली. यावेळी संस्थेचे संचालक किशोर कुऱ्हाडे, संतोष डुंबरे, डॉ. डी. डी. गायकवाड, विशाल फार्मसीच्या प्राचार्य डॉ. ए. आर. हांडे, विशाल कुऱ्हाडे यांनी सर्टिफिकेट कोर्सबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, खजिनदार रोहिदास पाडेकर, अर्जुन पाडेकर, बाळासाहेब जाधव, प्रसन्न डोके, माऊली कुऱ्हाडे, बबनराव सहाने, जी. एल. गुंजाळ, अरुण हुलवळे, राजेंद्र कुऱ्हाडे, संपत गुंजाळ, तुकाराम गाढवे आदी उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, प्रा. संजय वाकचौरे, डॉ. राधाकिशन तागड, डॉ. जयसिंग गाडेकर, प्रा.विकास पुंडे, प्रा. वृषाली ढोबळे यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00783 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top