राजुरी शाळेत भरला ५० वर्षांनी वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी शाळेत भरला ५० वर्षांनी वर्ग
राजुरी शाळेत भरला ५० वर्षांनी वर्ग

राजुरी शाळेत भरला ५० वर्षांनी वर्ग

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ७ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता अकरावीच्या १९७२च्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा येथील छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यालयात स्नेहमेळावा झाला.
या सोहळ्यात जवळपास २५ ते ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी बरेचजण पुणे, मुंबई या ठिकाणाहून कार्यक्रमास आले होते. कार्यक्रमाच्या वेळी बऱ्याच जणांनी आपल्या पन्नास वर्षातील करिअरची माहिती एकमेकांना सांगितली. तसेच सर्वजण बालपणीच्या आठवणींमध्ये आणि गप्पांमध्ये रममाण झाले होते. त्यामुळे महाविद्यालयातील गतकालीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्याचे नियोजन नामदेव हाडवळे, नंदकुमार नाचर यांनी केले होते

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00786 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top