आळेफाटा येथे गायींच्या किमती वधारल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथे गायींच्या किमती वधारल्या
आळेफाटा येथे गायींच्या किमती वधारल्या

आळेफाटा येथे गायींच्या किमती वधारल्या

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१२ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा (ता.जुन्नर) येथील बाजार समितीमध्ये दर गुरुवारी गायींचा बाजार भरत असतो. सध्या दुधाच्या बाजारभावात वाढ झाल्याने गायींच्या किमतीत वाढ झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत आळेफाटा येथील येथील बाजारात पुणे, नाशिक, नगर तसेच ठाणे जिल्ह्यातून अनेक व्यापारी तर शेतकरी गायींच्या खरेदी विक्री साठी येत असतात. विशेष म्हणजे येथील बाजार संकरित गाई विक्रीसाठी येत असतात.
दरम्यान, गेल्या महिन्यात दुधाचा भाव वाढल्याने गायींच्या किमतीत देखील वाढ झालेली आहे. साधारणपणे १० हजारांपासून ७० हजारापर्यंत गायींच्या किमती होत्या. तसेच सध्या कडक असा उन्हाळा सुरू असल्याने चारा टंचाई जाणवत आहे. यामुळे बाजारात विक्रीसाठी जास्त येतात. मात्र आता गायींची विक्री होत नाही, अशी माहिती अमोल कुऱ्हाडे, सुमीत वर्पे, चाँदभाई शेख, रूपेश कुऱ्हाडे या व्यापाऱ्यांनी दिली.

01360

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00798 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top