दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१२ : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना सोमवारी (ता.९)पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.९) पहाटे आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रघुनाथ शिंदे, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पद्मसिंह शिंदे हे गस्त घालत होते. त्यांना कल्याण-नगर मार्गावरील आळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत बोरी फाटा या ठिकाणी आळेफाटा बाजूने आलेल्या मोटार संशयीतरीत्या भरघाव वेगाने जाताना आढळून आली. पोलिसांनी या वाहनास पाठलाग करून पकडले. त्यावेळी मोटारीतील सात अनोळखी व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. परंतु पोलिसांनी त्यांचा पुन्हा पाठलाग केला असता रस्त्याशेजारी उसाच्या शेतात लपून बसलेल्या नवनाथ राजू पवार (वय २१, रा.ढोकी ता.पारनेर, जि. नगर) अनिकेत बबन पवार (वय२०, बोरी साळवाडी ता.जुन्नर), अंकुश खंडू पवार (रा. तांबवाडी, वडगाव सावताळ, ता.पारनेर, प्रवीण दत्तात्रेय आंबेकर (वय २५, वडगाव सावताळ, ता.पारनेर) या चार जणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता आळेफाटा या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलो होतो, असे कबूल आहे. तसेच त्यांच्याजवळ असलेले लोखंडी हातोडा, चाकू, कोयता, स्कू ड्रायवर, कटर, नायलॉन रस्सी, चिगटपट्टी, टॉच, मिरची पावडर मोबाईल हे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
यातील कैलाश शिंदे धोत्रे (ता.पारनेर), विशाल खंडू पवार (रा.तांबवाडी वडगाव सावताळ), विकास बर्डे (लाखणगाव ता.आंबेगाव) हे फरार झालेले आहेत.
पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00799 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top