
नवचैतन्य शिबिरास प्रतिसाद
आळेफाटा, ता. १४ : तेजपर्व रेज्युव्हिनेशन (नवचैतन्य शिबिराचे) कॅम्पचे सांदण व्हॅली (जि. नगर) येथे तेजपर्व फाउंडेशनच्या वतीने ११ व १२ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती अध्यक्ष अमोल कापसे यांनी दिली.
यामध्ये मानसिक सामर्थ्याचे महत्त्व पटवून देऊन आई वडिलांप्रती आदरभाव वृद्धिंगत करणे व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या कॅम्पमध्ये आळेफाटा, जुन्नर, चाकण खेड, नाशिक, मुंबई, सातारा या ठिकाणच्या ४ ते ५८ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला. एकूण ७० जणांनी यामध्ये सहभाग घेतला.
कॅम्पमध्ये भावनिक सामर्थ्यासाठी क्लिंझींग मेडिटेशन, स्वप्नपूर्तीसाठी सन मेडिटेशन, शारीरिक व बौद्धिक क्षमतेसाठी नावीन्यपूर्ण खेळ, साहस वृद्धीसाठी ट्रेकिंग व रॅपलिंग आणि मनोरंजनासाठी डान्स, पारंपरिक आदिवासी तांबड नृत्य, सांघिक खेळाचे आयोजन केले होते. झुंबा डान्सचे प्रशिक्षण कांती प्रजापती व श्वेता पांडे यांनी, रॅपलिंगचे प्रशिक्षण संदेश दप्तरे व सहकारी यांनी तर लाठीकाठीचे सादरीकरण शिवकन्या भडांगे व जान्हवी कापसे यांनी दिले.
या वेळी विद्यार्थ्यांचे स्वागत शिवाजी गोरे, हर्षल मुथा व रेश्मा कापसे यांनी केले. शिबिरासाठी विशेष सहकार्य मीनल सांडभोर, सचिन बाम्हणे, मयूर मिरे, सतीश सहिंद्रे, राहुल कराळे, ऋषी पोळ, गणेश आवटे, आदित्य वामन, साहिल डोंगरे, विकी आल्हाट आणि सोमनाथ शिंगाडे यांनी केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00804 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..