
आळेफाटा येथे काळी मैना दाखल
आळेफाटा, ता. १६ : माळशेज घाटाच्या डोंगदऱ्यातील आंबटगोड काळी मैना आळेफाटा बाजारात उपलब्ध होऊ लागल आहे. त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. रस्त्यावर
दारोदारी फिरून आदिवासी त्याची विक्री करत आहे.
जुन्नरच्या पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, आळे गावातील मांडवदरा तर आणे पठारावरील नळावणे, गुळुंचवाडी या ठिकाणी तर तालुक्याच्या पश्चिम भागातील माळशेज घाट, खिरेश्वर, सीतेवाडी, हरिश्चंद्र गड या भागात करवंदाच्या जाळी मोठ्या प्रमाणावर आहेत.
रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता रानात फिरून काटेरी जाळीत शिरूर गोळा करत असतात. गावोगावच्या आठवडे बाजारात येऊन विकून यामधून त्यांना चांगले पैसे मिळतात.आळेफाटा या ठिकाणी तर माळशेज घाटातील स्थानिक ग्रामस्थ करवंदे घेऊन विकण्यासाठी येत असतात .येथील स्थानिक व्यापारी यांच्याकडून खरेदी करून थेट शहरात निभाव पध्दतीने देतात तर काहीजण दारोदारी,बाजारात जाऊन विकतात यामध्ये पाच ते दहा रुपयांना एक ग्लास किंवा कपात देऊन ती पळसाच्या मोठ्या पानावर करवंदे खायला देत असतात तर दिडशे ते दोनशे रुपये प्रती किलोनेही करवंदाची विक्री केली जाते.
लॉकडाउनच्या काळात गावोगावी भरणाऱ्या आठवडे बाजारात तसेच यात्रा उत्सवांना बंदी होती. त्यामुळे करवंदे असून देखील विकता आली नाहीत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. परंतु यावर्षी कोरोना नसल्याने करवंदांची चांगली विक्री होत आहे. सध्या किलोला दीडशे ते दोनशे रुपये बाजारभाव मिळत आहे.
- रमेश मेंगाळ, करवंदे विक्रेते
01376
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00806 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..