आणे घाटात १० प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणे घाटात १० प्रवासी जखमी
आणे घाटात १० प्रवासी जखमी

आणे घाटात १० प्रवासी जखमी

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१९ ः अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे घाटातील वळणावर छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन १० प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास घडली.
आणे (ता.जुन्नर) बसस्थानकावर एसटी बस मिळत नसल्याने १० प्रवासी छोटा हत्ती टेम्पोमधून बेल्हे या ठिकाणी जाण्यासाठी बसले. पुढे २ किलोमीटर असणाऱ्या आणे घाटातील वळणावर चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटले व टेम्पो पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. विद्या वाघ (वय ७), पोपट जाधव (वय ५१), पृथ्वी काळे (वय ७), गंगाराम काळे (वय ३०), पोपट जाधव (वय ५१), जगन्नाथ चिकणे (वय५३), सुजाता वाघ (वय २२) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. तीन प्रवाशांना हाताला तसेच पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे पाठवण्यात आले. अपघाताची माहिती समजताच बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड यांनी जखमींवर तत्काळ उपचार केले.