श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानला एटीजीचे प्रमाणपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानला एटीजीचे प्रमाणपत्र
श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानला एटीजीचे प्रमाणपत्र

श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानला एटीजीचे प्रमाणपत्र

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २ : श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलाविलेल्या आळे (ता. जुन्नर) येथील श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानला नुकतेच एटीजीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे देणगीदारांना इन्कमटॅक्स मधून सूट मिळणार आहे. यामुळे देवस्थानच्या सुरू असलेल्या कामाला वेग येऊन देणग्यांच्या प्रमाणात वाढ होईल अशी आशा आहे. सदर प्रमाणपत्र मिळण्यासाठी देवस्थान सन २०१८ पासून प्रयत्न करत होते. नुकतेच हे प्रमाणपत्र मिळाल्याने देवस्थान व भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवस्थानच्या वतीने यावर पत्रकार परिषद घेऊन प्रमाणात मिळाल्याची अधिकृत माहिती दिली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष चारुदास साबळे, उपाध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, सेक्रेटरी संतोष पाडेकर, खजिनदार संजय खंडागळे, धनंजय काळे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे, विलास शिरतर, म्हतुजी सहाने, बाळासाहेब शेळके, गिरीश कोकणे, ॲड. सुदर्शन भुजबळ, गोरक्ष गुंजाळ, संजय शिंदे, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00837 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top