
सोयाबीन पेरताना बीबीएफ यंत्र वापरा सोसाबीन पेरता बीबीएफ यंत्राचा वापर करा
आळेफाटा, ता. ४ : खरीप पूर्व नियोजनामध्ये सोयाबीनचे वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी. बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी. शेतामध्ये बियाणे पेरताना बीबीएफ यंत्राचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली
वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले होते. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी हरीश माकर, कृषी पर्यवेक्षक शिवकांत कोल्हे, तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक, कृषी सहाय्यक मुकेश महाजन व सर्व कृषी विभागाचे कर्मचारी तसेच गोमाता दूध संघाचे सुरेश गडगे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज, कृषी विज्ञान केद्र नारायणगावचे मृदा तज्ज्ञ डॅा.योगेश यादव, पीक संरक्षण तज्ज्ञ शिवाजी कांबळे, शाश्वत फाउंडेशनचे वघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या लागवड संदर्भात सविस्तर माहिती देऊन श्री. कांबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वगरे सर यांनी पोषणबाग (परसबाग) या विषयी मार्गदर्शन केले.
खत व्यवस्थापन केल्यास ४० टक्के बचत
एकात्मिक खत व किड रोग व्यवस्थापण तसेच खत औषधांचा खर्च कमी करण्यासाठी १० ड्रम थेअरी आवश्यक आहे. माती परीक्षण कसे व का करावे, त्याचे महत्व व गरज व त्यानुसार खत व्यवस्थापण केल्यास ४० टक्के खताची बचत करता येईल व सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रीय व हिरवळीच्या खतांचा वापर करावा याबाबत मृदा तज्ज्ञ डॅा.योगेश यादव शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सचिन वाळुंज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली देवकर यांनी आभार मानले.
01444
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00841 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..