
ज्ञानमंदिर महाविद्यालयाचा निकाल ९२.४५ टक्के
आळेफाटा, ता. ९ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९२.४५ टक्के लागला. त्यामध्ये कला शाखेचा निकाल ६२.९९ टक्के, वाणिज्य मराठी शाखेचा निकाल ८७.१६ टक्के, वाणिज्य इंग्रजी शाखेचा निकाल ९७.१६ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९८.८५ टक्के लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, संचालक प्रसन्न डोके, माजी अध्यक्ष किशोर कुऱ्हाडे, बी. आर. सहाणे, बीबीए बीसीए कमिटीचे अध्यक्ष जी. एल. गुंजाळ, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अर्जुन पाडेकर, माऊली कुऱ्हाडे, अरुण हुलवळे, संपत गुंजाळ, राजु कुऱ्हाडे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00851 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..