राजुरीत बनविले दहा हजार बीज गोळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत बनविले दहा हजार बीज गोळे
राजुरीत बनविले दहा हजार बीज गोळे

राजुरीत बनविले दहा हजार बीज गोळे

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २१ : पंचायत समिती जुन्नर, आश्वास संस्था व राजुरी (ता. जुन्नर) येथील महिला बचत गटाच्या महिलांनी जागतिक पर्यावरण दिन व पावसाळ्याच्या तोंडावर मोकळ्या माळरानावर व डोंगरावर वृक्षरोपन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी बीजगोळे तयार करण्याचा उपक्रम राबविला. त्यानुसार त्यांनी दहा हजारांहून अधिक बीज गोळे बनविले.
गावातील क्रांती महिला ग्रामसंघ, शिवाई महिला संघ, कृषी कन्या ग्रामसंघ व सर्व बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन बीजगोळ्यांची निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ यांच्या मार्गदर्शनाखाली हेमलता शिंदे, हसीना जमादार, अश्विनी हाडवळे, प्रतिभा औटी, मंजू हाडवळे, शुभांगी कुटे, गुलनाज जमादार, सीमा कणसे, उषा अभंग या महिलांनी; तर आश्वास संस्थेचे अभिषेक कोल्हे, रमेश कोल्हे, आर्या बेनके, अबोली देशमुख, ओंकार खराडे, ओंकार वाळुंज, निर्मला गाढवे, रवींद्र आल्हाट  यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व बचत गटाच्या  महीलांना एकत्र घेऊन जवळपास दहा हजार बीज गोळे (सीड बॉल) बनवले. येथील महिलांनी एकत्रित येऊन मातीच्या चिखलापासून बनविलेल्या गोळ्यांत चिंच, जांभूळ व इतर बियाणे टाकत सीड बॉल तयार केले. ते राजुरी येथील दावलमलिक मंदिर परिसरात असलेल्या जंगलात व उंचखडक येथील जंगलात, मोकळे रान व डोंगर माळरान परिसरात बचत गटाच्या महिलांमार्फत रोपण केले.
   
जुन्नर पंचायत समीतीच्या मार्गदर्शनाखाली आश्वास संस्थेने दहा लाख बीज गोळे बनवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. प्रत्येक गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख बीज गोळे तयार केले आहेत. त्यांची लागवड ज्या गावात मोकळी राने, डोंगर आहेत, अशा ठिकाणी केलेली आहे.
- अभिषेक कोल्हे, समन्वयक, आश्वास संस्था

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00879 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top