
राजुरीत चैतन्य महाराजांच्या पालखीचे स्वागत
आळेफाटा, ता.२३ : राजुरी (ता.जुन्नर) या ठिकाणी श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीच्या जोरदार स्वागत करण्यात आले. ओतूर, उदापूर या ठिकाणाहून पंढरपूर येथे पायावारी निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरू असलेले चैतन्य महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजुरी (ता.जुन्नर) येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळा राजुरीजवळ ग्रामस्थांनी वारकऱ्यांबरोबर गावातून प्रदक्षिणा घातली. त्यानंतर हनुमान मंदिरात सुनील महाराज बुट्टे यांची कीर्तन सेवा झाली त्यानंतर सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.
पालखीच्या स्वागतप्रसंगी उपसरपंच माऊली शेळके, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर औटी, युवा नेते वल्लभ शेळके, शरदचंद्र पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जि.के.औटी, अनंतराव गटकळ, शिवाजीराव हाडवळे, बाळासाहेब हाडवळे, जयसिंग औटी, धिरज औटी, तुकाराम डुंबरे, रखमा रायकर, सुरेश बोरचटे आदी मान्यंवर ग्रामस्थ उपस्थित होते.
01517
Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00885 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..