वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

sakal_logo
By

आळेफाटा, ता.३ : नगर-कल्याण महामार्गावरील गुंजाळवाडी (ता.जुन्नर) शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रविवारी (ता.३) सायंकाळी दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. राजुरी येथील बाळू हाडवळे हे आपल्या दुचाकीवरून पेट्रोल टाकण्यासाठी बेल्हे येथे गेले होते. तेथून नगर-कल्याण महामार्गाने राजुरी येथे परतताना गुंजाळवाडी शिवारात आले असता सायंकाळच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते जागेवर ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पोलिस पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00908 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..