बोरीतील पूल कोसळण्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीतील पूल कोसळण्याची भीती
बोरीतील पूल कोसळण्याची भीती

बोरीतील पूल कोसळण्याची भीती

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१४ : साळवाडी-बोरी बुद्रूक या दोन गावांना जोडणारा कुकडी नदीवर असलेला पुलाचा भाग चार वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने कुठल्याही प्रकारे पुलाचा भरावा न भरता नुसते बिम उभे करून नावापुरते काम केलेले आहे. जोरदार पाऊस आल्यास हा पूल निकृष्ट कामामुळे पुन्हा कोसळण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बोरीतील पुलाच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांनी एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. पण त्याचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू असून येडगाव धरणातून नदीला पाणी सोडलेले आहे. या पुलाचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे जोरदार पाण्याच्या प्रवाहाने या पुलाचा भाग कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थांनी येथील पुलाची चांगली दुरुस्ती करावी, अशी मागणी करून सुध्दा बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. भविष्यात या पुलाचा काही भाग कोसळला मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील, असा कडक इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व राजू भोर यांनी दिला आहे.
दरम्यान, साळवाडी ते जांबुत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणाहून जात असताना वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या दोन गावांमधील अंतर केवळ सहा ते सात किलोमीटर असून केवळ रस्तावर खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना हे अंतर कापायला अर्धा ते एक तास लागत आहे. तसेच एखा़दे वाहन खड्डयांत जाऊन पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडत आहे. यामुळे वाहनचालकांसोबत वारंवार वाद होत आहेत.

01604

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00933 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..