महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबईत भुजबळ यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबईत भुजबळ यांचा सन्मान
महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबईत भुजबळ यांचा सन्मान

महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबईत भुजबळ यांचा सन्मान

sakal_logo
By

आळेफाटा, ता.२७ : मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. ओबीसी समाज बांधवांना आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भुजबळ यांनी यावेळी सर्व समता सैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले, की तुम्हाला मिळालेल्या राजकीय आरक्षणाच्या संधीचे सोने करून जनतेच्या सेवेच्या कामाला लागा. तसेच गोरगरिबांच्या लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडून समाज हिताची कामे मार्गी लावा.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ तसेच उपस्थित तसेच जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01658

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00960 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top