बोरी बुद्रुक येथे ड्रोनद्वारे शासकीय मोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी बुद्रुक येथे ड्रोनद्वारे शासकीय मोजणी
बोरी बुद्रुक येथे ड्रोनद्वारे शासकीय मोजणी

बोरी बुद्रुक येथे ड्रोनद्वारे शासकीय मोजणी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १४ : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथे स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाअंतर्गत ड्रोन व रेव्हर तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण गाव शासकीय मोजणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खुणा लावण्यासाठी लगबग सुरू आहे. गावातील प्रत्येक शेत जमीन गटाला वहीवाटीच्या खुणा लावणे, मोजणीचे अर्ज भरणे यासाठी सर्व गावात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेत जमिनीची शासकीय मोजणी होत आहे.
बोरी बुद्रुक गावच्या १६०९ हेक्टरची व १७७६ गटांची (४०२२)एकरी मोजणी ड्रोन व रेव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून होत आहे‌. यासाठी जिल्हा भूमीलेखचे अधीक्षक सूर्यकांत मोरे, तालुका भूमीअधीक्षक गांगुर्डे यांनी याबाबत या गावात येऊन या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले आहे. याप्रसंगी संपूर्ण गावाच्या शेतजमीन करता करावयाचे नियोजन, त्यांचे टप्पे, मोजणीच्या शासकीय पद्धती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतजमिनीची वहिवाटी व पोटहिस्से याबाबतच्या खुणा करणेबाबत शेतकऱ्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान, विशेष म्हणजे सकाळ अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाअंतर्गत ही संपूर्ण गाव मोजणी राबविण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00987 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..