राजुरी येथे कवायती सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथे कवायती सादर
राजुरी येथे कवायती सादर

राजुरी येथे कवायती सादर

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १९ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजुरी (ता. जुन्नर) येथील महारिया चॅरिटेबल ट्रस्टचे सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त सचिन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करून विविध कवायती सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून आपापले विचार भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतावर कलाविष्कार सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष व्ही. आर. दिवाकरण, खजिनदार किशोरभाई पटेल, सदस्य डॉ. कर्झन भानुशाली, सचिन चव्हाण, उपप्राचार्य पी. बलारामुडू, स्कूलच्या मुख्याध्यापक अमोल जगदाळे, सह्याद्री अभियांत्रिकीचे कर्मचारी, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपाली सौदडे आणि सलमा चौगुले यांनी केले. कार्यक्रम उत्साहात करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00998 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..